अज्ञात वाहनाच्या धडकेत रिक्षाचालकात जागीच मृत्यू

Accident

पारोळा प्रतिनिधी । भोकरबारी फाट्याजवळ रिक्षाला अज्ञात वाहनचालकाने धडक दिल्याने रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन महिला गंभीर जखमी झाले.

पारोळ्याकडून अमळनेरकडे जाणारी रिक्षा एमएच-१९-एई-१२४८ जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने जोरदार धडक दिली. त्यात रिक्षाचालक सुपडू गजमल पाटील (वय ६०, रा.अमळनेर) यांचा मृत्यू झाला तर रिक्षामधील प्रवासी कलाबाई जगन्नाथ, प्रवासी कलाबाई जगन्नाथ पाटील, लताबाई बापूराव पाटील दोन्ही रा. रा.होळपिंप्री, ता.पारोळा, द्वारकाबाई निंबा पाटील रा.रत्नापिंप्री, ता.पारोळा हे जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर वाहनचालक आपली गाडी घेऊन फरार झाला. याबाबत दीपक राजेंद्र पाटील यांनी पारोळा पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र रावते करीत आहे.

Protected Content