एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांचे रेशन कार्ड होणार रद्द !

रावेर प्रतिनिधी । तालुक्यात पुरवठा विभागातर्फे रेशन कार्ड शोध मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांचे उत्पन्न एक लाखा पेक्षा जास्त आणि ज्यांना धान्य मिळते, असे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. यासाठी पुरवठा विभागातर्फे तालुकाभरात सुमारे ७१ हजार रेशन कार्डच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.

शासनामार्फत वार्षिक उत्पन्न एक लाखा पेक्षा अधिक असलेल्या शासकीय , निमशासकीय , खाजगी नोकरी करणारे अधिकारी , कर्मचारी यांचे रेशनकार्ड रद्द केले जाणार आहे.या मोहिमेत प्रत्येक रेशनकार्डाची तपासणी करण्यांत येणार आहे . कार्ड धारकाकडून विहीत नमुन्यातील अर्ज भरुन घेतला जाणार आहे. या अर्जासोबत संबंधित कार्डधारकाला एका वर्षाच्या आतील रहिवास पुरावा , अधार कार्ड , गॅस असल्यास पुस्तक, बँक पासबुकची प्रत जोडावी लागणार आहे.

शिल्लक धान्य गरीब, निराधार, कुटुंबाना

रावेर तालुक्यात ७१ हजार ३०३ विविध योजनेतील रेशन कार्ड धारक आहे.ज्यांची आर्थिकस्थिती चांगली आहे.नोकरी किंवा शेती असेल तर त्यांनी स्वता:हुन रेशन कार्ड वरील धान्य बंद करून घ्यावे किंवा आम्ही केलेल्या सर्वेक्षणातुन ते बंद होईल व शिल्लक धान्य आम्ही तालुक्यातील गरीब निराधार कुटुंबाना देणार आहे.माझा हेतु खऱ्या आणि गरजु लाभार्था पर्यंत शासनाचे धान्य पोहचावे  हा असल्याचे मत येथील पुरवठा अधिकारी हर्षल पाटील यांनी लाईव्ह’शी बोलतांना व्यक्त केले.

Protected Content