भुसावळात कोरोना नियमांचे उल्लघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

भुसावळ, प्रतिनिधी । कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  शहरात सकाळी ११ वाजेनंतर संचारबंदी असतांना काही नागरिक विनाकारण  बाहेर फिरत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर पोलीस प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली. अशा नागरिकांची  रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली असता सर्व निगेटिव्ह आले आहेत. 

पोलीस प्रशासनातर्फे  मंगळवार दि. १८ मे रोजी कोरोना नियमांचे व लॉकडाऊनचे उल्लघन करणाऱ्या २१४ जणांवर कारवाई करून   ४१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच १०१ रिक्षाचालकांवर  रिक्षा चालकांवर एमव्ही  ऍक्ट १७७  नुसार केसेस दाखल करून त्यांच्याकडून २० हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. व इतर ३४७ जणांवर अन्य मोटार वाहन ऍक्ट केसेस दाखल करून १ लाख ३४ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर आयपीसी १८८ नुसार ५ गुन्हे दाखल करण्यात आली असून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या १०१  जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली असता ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. 

 

Protected Content