विकास कामांसाठी साडेसहा कोटींचा निधी प्राप्त; कामांना लवकरच सुरूवात होणार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने सन २०२३ व २०२४ लेखाशीर्ष (४२१७०६०३) अंतर्गत यावल नगरपरिषदेच्या क्षेत्रातील विविध कार्यक्षेत्राचा विकास करण्यासाठी ६ कोटी ५०लक्ष रूपांचा निधी मंजुर केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावल नगर परिषदेच्या हद्दीतील विविध विकास कामांसाठी ६ नोव्हेंबर २०२३ यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने सन २०२३ व २०२४ लेखाशीर्ष (४२१७०६०३) अंतर्गत यावल नगरपरिषदेच्या क्षेत्रातील विविध कार्यक्षेत्राचा विकास करण्यासाठी ६ कोटी ५०लक्ष रूपांचा निधी मंजुर केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावल नगर परिषदेच्या हद्दीतील विविध विकास कामांसाठी ६ नोव्हेंबर २०२३ शासन निर्णयानुसार वैशिष्टयपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजने अंतर्गत तब्बल ६ कोटी ५० लक्ष रू. निधी शासनाच्या वतीने मंजुर करण्यात आलेला आहे. यात नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील तारकेश्वर महादेव मंदिराला संरक्षण भिंत व शोशुभीकरणासाठी ८० लक्ष, बोरवली गेट ते भुसावळ नाका रस्ता डांबरीकरण व काँक्रीट डिव्हायडर बांधण्यासाठी एक कोटी रुपये, शहरातील विस्तारित भागातील न्यू व्यास नगर, पांडुरंग सराफ नगर व स्वामी समर्थ नगर मध्ये रस्ते मजबुतीकरण करणे व डांबरीकरण करण्यासाठी एक कोटी रुपये, आयशा नगर, प्रभुलीला नगर व स्वामीनारायण नगर भागात रस्ते डांबरीकरण व गटार बांधकामासाठी १ कोटी ७० लक्ष, गजानन महाराज, मंदिर परिसर, बाबा नगर, रजा नगर, ईकरा नगर भागात डांबरीकरण व गटार बांधकामासाठी १कोटी., गट नं. ७०९, ७१० व ७१२ मध्ये रस्ते खडीकरण डांबरीकरण व गटर बांधकामासाठी ५० लक्ष व डांगपुरा कब्रस्तानाला संरक्षण भिंत बांधण्यासाठी ५० लक्ष रू. असे एकूण ६ कोटी ५० लक्ष रू मंजुर करण्यात आले आहेत. सदरची कामे करण्यासाठी कार्यान्वित यंत्रणा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग राहील असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सदर शासन निर्णयाचे पत्र नुकतेच यावल नगरपरिषदेला प्राप्त झाल्याने व निधी मंजूर झाल्याने शहरातील विविध विकास कामांना हातभार लागणार आहे. लोकसभा निवडणुक आचारसहींता लागण्यापुर्वी ही विकास कामे व्हावीत अशी अपेक्षा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी व्यक्त केली आहे. शासनाच्या वतीने शहराच्या विकास कामांसाठी ६ कोटी ५० लाख रूपयांचा निधी मंजुर झाल्याचे पत्र यावल नगर परिषदला प्राप्त झाले असुन, शहरातील सर्व विकास कामे ही यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन करण्यात येणार असल्याची माहिती शासन परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे . सदरची विकासकामे ही लोकसभा निवडणुकीपुर्वी पुर्ण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे .

Protected Content