एमआयडीसीतून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता सुमारास उघडकीला आली आहे. दरम्यान, मुलीच्या शोध घेऊनही ती मिळाली नाही, त्यामुळे बुधवार ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील एका भागात 14 वर्षी अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे 29 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता पिडीत मुलगी ही दुकानावर दुध घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. दरम्यान ही घटना तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतू तिच्याबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही, अखेर ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पीडित मुलीची आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.

 

Protected Content