टाळ्या पिटून व दिवे लाऊन कोरोना जाणार नाही- राहूल गांधी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । निव्वळ टाळ्या पिटून आणि दिवे लाऊन कोरोना जाणार नसल्याचे नमूद करत राहूल गांधी यांनी आज पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी गेल्या महिन्यात २२ मार्चला जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. यात आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या सर्व कर्मचारी आणि संस्थांचे आभार मानण्यासाठी मोदींनी हे आवाहन केलं होतं. यानंतर उद्या रात्री म्हणजे ५ एप्रिलला ९ वाजात ९ मिनिटं घरातील लाइट बंद करून नागरिकांनी मेणबत्ती, मोबाइलचा प्लॅश लाइट, टॉर्च किंवा दिवे पेटवण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये राहूल गांधी म्हणाले आहेत की, टाळ्या वाजवून, दिवे आणि टॉर्च पेटवून करोना पळणार नाही. करोनाचा सामना करण्यासाठी देशात पुरेशा चाचण्या केल्या जात नाहीए. नागरिकांना टाळ्या वाजवण्याचं आणि दिवे लावण्याचं आवाहन करून करोनाचे संटक दूर होणार नाहीए, असं राहुल गांधी म्हणाले. देशात करोना चाचण्या पुरेशा प्रमाणात होत नाहीए. १० लाख लोकसंख्येच्या तुलनेत होणार्‍या चाचण्या या अतिशय कमी प्रमाणात आहेत. भारतात इतक्या कमी चाचण्या का केल्या जात आहेत? असा प्रश्‍न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.

राहूल गांधी यांनी आधीदेखील कोरोनाच्या उपाययोजनांवरून पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. यानंतर त्यांनी आज पुन्हा टीकास्त्र सोडले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content