निवृत्तीनंतरही संघात सामील होण्यास सज्ज

Ambati Rayudu

नवी दिल्ली प्रतिनिधी । भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय बुधवारी 3 जुलै रोजी जाहीर केला. मात्र अंबाती रायुडू याने एका ‘स्पोर्ट्सस्टार’ मुलाखतीत सांगितले की, निवृत्तीनंतरही मी पुन्हा एकदा भारतीय संघातून खेळण्यासाठी तयार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता मला भारताबरोबर आयपीएलमध्येही खेळायचे आहे, असे रायुडू या मुलाखतीमध्ये म्हटल्याचे बोलले जात आहे. रायुडू सध्या तामिळनाडू येथे एक स्पर्धा खेळत आहे. या स्पर्धेदरम्यान रायुडूची मुलाखत घेतल्याचे म्हटले जात आहे. अंबाती रायुडूच्या नावाची चर्चा सातत्याने वर्ल्ड कप संघासाठी झाली. परंतु शिखर धवन व विजय शंकर यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्यानंतरही रायुडू वंचित राहिला. त्यानं विजय शंकरच्या निवडीनंतर ती नाराजी सोशल मीडियावर व्यक्तही केली होती. पण, अखेरीस त्यानं निवृत्तीचा निर्णय घेतला. 33 वर्षीय रायुडूनं 55 वन डे सामन्यांत 1694 धावा केल्या आहेत. त्यात तीन शतकं व 10 अर्धशतकांचा समावेश आहे. गेली अनेक वर्ष मधल्या फळीसाठी रायुडूला संधी दिली गेली, परंतु त्याला सातत्य राखता आले नाही. त्यामुळेच वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात त्याची निवड केली गेली नाही.

Protected Content