जळगावात भाजीपाला गाडी लावण्यातून हाणामारी ; एक गंभीर जखमी (व्हीडीओ)

b59395d7 486f 4dac bb9f bdc444e1b8f3

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सुभाष चौक परिसरात आज दुपारी भाजीपाला गाडी लावण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला. दरम्यान, पोलिसांनी परिसरात तगडा बंदोबस्त लावला आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास सुभाष चौक परिसरातील चौबे शाळेपुढे राजू सखाराम पाटील (वय 37, रा कासमवाडी) व पेहलवान (पूर्ण नाव माहित नाही) या दोघांमध्ये आपापली भाजीपाला गाडी लावण्यातून वाद झाला. थोड्याच वेळात वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यात पेहलवान याने राजू पाटील यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. त्यामुळे ते गंभीर जखमी झालेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला १२ ते १५ टाके पडल्याचे कळते. या हाणामारीत एका अन्य महिलेच्या हाताला देखील लोखंडी रॉड लागला आहे. दरम्यान, शनीपेठ पोलिसांनी पेहलवान नामक व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे.

 

 

a5797f43 36e0 4dcd a37d 1fb898f753c0

Protected Content