सचिन पायलट आज खोलणार पत्ते !

शेअर करा !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । बंडखोर काँग्रेस नेते सचिन पायलट हे आज आपल्या पुढील वाटचालीबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. तर यासोबत भाजपची देखील महत्वाची बैठक होत असल्याने राजस्थानच्या राजकारणात आजचा दिवस हा विलक्षण घडामोडींचा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

store advt

सचिन पायलट यांनी आपल्या सहकारी आमदारांसह बंडाचा पवित्रा घेतल्याने राजस्थानातील राजकारण ढवळून निघाले आहे. सचिन पायलट यांची पक्षाने प्रदेशाध्यक्ष पदासह उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी केली. पक्षाचे बहुतांश आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा देखील मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे. तर या सर्व प्रकाराला भाजपची फुस असल्याचा आरोप देखील काँग्रेसतर्फे लावण्यात आला आहे.

सचिन पायलट यांनी या प्रकारावर काही ट्विटच्या व्यतीरिक्त आपले विचार अजून स्पष्ट केले नाही. विशेष करून अशोक गेहलोत, त्यांचे काही सहकारी आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सचिन पायलट यांना टार्गेट केले असले तरी ते आजवर चुप्पी साधून आहेत. खरं तर, ते काल सायंकाळी पत्रकार परिषद घेतील अशी शक्यता होता. मात्र याऐवजी त्यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. यात ते आपल्या आगामी वाटचालीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. अर्थात, ते आज चुप्पी सोडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे आज भाजपने आज जयपूरमध्ये सकाळी ११ वाजता पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. राज्यातील विद्यमान राजकीय स्थितीवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!