मोदी सरकारला काय करायचं याची काहीच कल्पना नाही : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारत प्रत्येक ठिकाणी आपण आपली ताकद आणि सन्मान गमावत आहोत. सरकारला काय करायचं याची काहीच कल्पना नाही, असे ट्वीट करत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सरकारवर चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याच्या प्रकल्पातून इराणने बाहेर काढल्याच्या मुद्द्यावरून टीका केली आहे.

 

 

इराणने भारताला चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याच्या प्रकल्पातून बाहेर काढले आहे. यावरुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झाली आहेत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी टीका केली असून आपली ताकद आणि सन्मान गमावत असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्यासाठी करार करण्यात आल्यानंतर चार वर्षांनी इराणने भारताला या प्रकल्पातून बाहेर काढले आहे. अफगाणिस्तान सीमारेषेलगत हा रेल्वे मार्ग उभारला जाणार होता. परंतू भारताकडून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी तसेच निधी मिळण्यास विलंब होत असल्याचे सांगत इराण सरकारने भारताला या प्रकल्पातून बाहेर काढले आहे.

Protected Content