अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन , हाऊस ऑफ कलाम , रामेश्वरम , तामिळनाडू या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य समन्वयकपदी मनीषा चौधरी यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.
कलाम सर यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य आणि कलाम सर यांचे स्वप्नातील विकसित राष्ट्र घडविण्याचे कार्य संस्थेतर्फे केले जाते. २०१६ पासून मनीषा चौधरी या संस्थेचे कार्य महाराष्ट्रात करीत असून या वर्षी त्यांना संस्थेतर्फे पुन्हा नियुक्त करण्यात आले आहे. १५ ऑक्टोबरला कलाम सर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्रभर शाळा आणि कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, कुशल बुद्धी , चांगले विचार आणि कला गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम AKIF या संस्थेतर्फे मनीषा चौधरी यांचे नेतृत्वात मोफत राबविले जातील.
राष्ट्रीय स्तरावर चित्रकला स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष काम करणारे मॉडेल्स अश्या विविध स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त शाळांनी सहभाग नोंदवावा असेही आवाहन मनीषा चौधरी यांच्याकडून करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्तरावरील या सर्व स्पर्धा मोफत असून विजयी विद्यार्थ्यांना कलाम कुटुंबियांकडून प्रशस्ती पत्रे दिले जातील.