‘बिनशेती प्लॉटमधील खरेदीखतास नाव लावण्याचा आदेश व्हावा’ – नागरिकांची मागणी

यावल प्रतिनिधी | बिनशेती प्लॉटमधील पैकी क्षेत्राचे खरेदीखतास नाव लावण्यासाठी आदेश होण्याबाबत मागणीसाठी यावल तालुक्यातील नागरिकांनी फैजपूर येथील उपविभागीय अधिकारी यांना अर्ज दिला आहे.

या अर्जात, “तालुक्यातील बिनशेती बखळ प्लॉट जागेचे सामायिकात प्लॉट विभाजन न करता खरेदीखत केल्यावर तलाठी आणि मंडळ अधिकारी खरेदी खताप्रमाणे त्याचे नाव सातबारा उताऱ्यावर लावत नाही. ते म्हणतात की, ‘फैजपूर प्रांताधिकारी यांच्याकडून नजराणा रक्कम भरून परवानगी आणा तेव्हाचं तुमचे सातबारा उताऱ्यावर लावू. तुकडाबंदीचा कायदा भंग झाल्यामुळे आम्ही तुमचं नाव लावणार नाही” असे नमूद करण्यात आले आहे.

“नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडील पत्रानुसार ‘बिनशेती प्लॉट मिळकत खरेदी विक्री करण्यासाठी परवानगीची गरज नाही’ असे सांगितले आहे. ‘जागेचे सामायिकात प्लॉट विभाजन न करता खरेदीखत केल्यावर तलाठी आणि मंडळ अधिकारी खरेदी परवानगीची गरज नाही पण बिनशेती प्लॉट समाईक खरेदी-विक्रीसाठी तुकडा बंदी कायदा आणि तडजोड कायद्याची तरतूद लागू होत नाही.’

असा शासनाचा नियम असूनसुद्धा ‘बखळ प्लॉट सामाईक खरेदी केल्यानंतर सदर सातबारा उतारा स्वतंत्र होत नाही. त्याच्या घेणाऱ्याचे नाव त्याच सातबारा उताऱ्यावर सामायिकात दाखल होते. बिनशेती प्लॉटची सामायिक खरेदी केल्यानंतर त्याची लांबी आणि रुंदीची क्षेत्रफळात तफावत होत नसताना तलाठी व मंडळ अधिकारी हे यावल तालुक्यातील जनतेची पिळवणूक करत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात हे नियम लागू नसून फक्त यावल तालुक्यातील फैजपूर विभागात सामान्य जनतेला त्रास देण्याच्या हेतूने हा तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी हा नियम स्वतःच्या मतांना यांनी लावलेला आहे. असं निवेदनात नागरिकांनी लिहलं असून “बिनशेती प्लॉटची सामाईक खरेदी खतात नाव दाखल होण्यासाठी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचे आदेश व्हावेत’ अशा प्रकारची मागणी नागरिकांनी विनंती अर्जाद्वारे केली आहे.

या विनंती अर्जावर माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक राकेश कोलते, अनुसूचित जाति मोर्चा भारतीय जनता पार्टी यावल तालुकाध्यक्ष अनिल डाबरे, विजय बारी, संजय जोशी, रमेश जोशी, यांच्या सह्या आहेत.

Protected Content