रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था असलेल्या रावेर शिक्षण संवर्धक संघाच्या संचालक मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक ११ मे २०२५ रोजी होणार आहे. संघाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली असून, या निवडणुकीकडे शहरातील शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि आठ संचालक अशा एकूण ११ पदांसाठी मतदान होणार आहे. रावेर शहरातील शैक्षणिक घडामोडींमध्ये या संस्थेचे मोठे योगदान असल्याने, या संचालक मंडळावर निवडून येणे शहरात प्रतिष्ठेचे मानले जाते. संस्थेचे अधिकृत सभासद या निवडणुकीत मतदान करून आपले प्रतिनिधी निवडतील.
निवडणूक कार्यक्रमानुसार, लवकरच अर्ज भरणे, छाननी, नामनिर्देशन, प्रचार आणि मतदान यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांची अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार आहे. रावेर शहरातील शैक्षणिक क्षेत्रासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याने, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.