चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; नराधमावर गुन्हा दाखल

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील पंचशील नगर मध्ये एका भागात राहणाऱ्या सहा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक शुक्रवार १८ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता घडला आहे. याबाबत सायंकाळी ६.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील पंचशील नगर परिसरातील एका भागात ६ वर्षाची चिमुकली ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी १८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता या परिसरात राहणारा संशयित आरोपी अमीन नूर मोहम्मद बागवान (वय-४० रा. पंचशील नगर) याने पीडित मुलीला सोबत घेऊन तिच्या सोबत अत्याचार करायचा प्रयत्न केला. दरम्यान पीडित मुलीने त्याचा हात झटकून तेथून पळ काढून घेत प्रकारची तिनेतीच्या नातेवाईकांना सांगितला. दरम्यान पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिला सोबत नेत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आता घेऊन या संदर्भात तक्रार दिली आहे. दरम्यान या संदर्भात संशयित आरोपी अमीन नूर मोहम्मद बागवान याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात सायंकाळी ६.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पोलीस तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहे.

Protected Content