घरात घुसून महिलेचा विनयभंग; एकाला अटक

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका ३० वर्षीय परप्रांतीय महिलेचा अनधिकृतपणे घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी १८ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता घडली आहे. याबाबत सायंकाळी ६ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार भुसावळ तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय महिला हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान १८ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता घरात कोणीही नसताना गावात राहणारा संशयित आरोपी प्रवीण सुभाष सुरवाडे हा महिलेच्या घरात घुसून महिलेला मिठीत घेऊन तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. दरम्यान तिचे पती घरी आल्यानंतर त्यांना देखील चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर पीडित महिलेने वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन या संदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार सायंकाळी ६ वाजता संशयित आरोपी प्रवीण सुरवाडे यांच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद कंखरे करीत आहे.

Protected Content