कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी प्रशासनाकडून दर निश्चित

बुलडाणा प्रतिनिधी । राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार कोविड रूग्णांच्या उपचारासाठी खाजगी कोविड रूग्णालयांना कोविड रूग्णांच्या उपचाराचाकरीता घ्यावयाच्या शुल्काची निश्चिती करण्यात आली आहे.  तरी सर्व खाजगी कोविड रूग्णालयांनी समान दर असल्यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांकडूनही समान असलेले दर घ्यावे. त्यासाठी दर निश्चित करण्यात आले आहे.

जिल्ह्याकरीता दर निश्चित करण्यात आले असून त्याबाबतच्या अटी व शर्तीही लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोणत्याही खाजगी कोविड रूग्णालय / नर्सिंग होम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मान्यतेशिवाय 80 टक्के बेडची संख्या कमी करू नये. महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा 2006 मधील तरतुदींना अनुसरून सर्व आवश्यक प्रक्रिया पुर्ण करून खाजगी कोविड रूग्णालयांनी बेड वाढविण्याबाबत कार्यवाही करावी. शासन निर्देशानुसार उपलब्ध बेड संख्येच्या 80 टक्के बेडवर उपचाराकरीता भरती असलेल्या रूग्णांकडून शासकीय दराने उपचार करून आरोग्य सुविधा पुरवाव्यात. आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सर्व नर्सिंग आणि सहाय्यक कर्मचारी यांना संपूर्ण पाठींबा व सहकार्य करावे. कोणत्याही गटाकडून किंवा समुहाकडून सुरळीत आरोग्य सेवा पुरविण्याच्या कार्यात अडथळा निर्माण करणारी कृती झाल्यास दंडात्मक तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल. 

कोणत्याही रूग्णालयात या आदेशातील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास अशा रूग्णालयाचा परवाना रद्द करणे व भारतीय दंड संहीता अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही करण्यात येईल. आरोग्य सेवा प्रदाते यांनी परवानगी असलेली बेड संख्या, कार्यान्वीत बेडची संख्या, रिक्त असलेल्या बेडपैकी व नॉन रेगुलेटेड या वर्गवारीतील बेडची संख्या दर्शविणारे फलक दर्शनी भागात लावण्यात यावे. सर्व रूग्णालयांनी  निश्चित करण्यात आलेले दराचे फलक रूग्णालयाच्या दर्शनी भागात लावावेत. सदर दर जिल्ह्यातील सर्व खाजगी कोविड रूग्णालय अथवा नर्सिंग होम यांना लागू असून कोरोना बाधीत रूग्णांकडून यापेक्षा जास्त रक्कम घेवू नये.

शासन मार्गदर्शक सुचनेनुसार 80 टक्के व 20 टक्के बेड क्षमतेवर भरती असलेल्या रूग्णांच्या उपचारामध्ये कोणताही फरक केल्या जाणार नाही. सदर दर जिल्ह्यात 31 ऑगस्ट 2021 पर्यंत लागू असणार आहेत. निश्चित दर व अटी, शर्तींचे खाजगी कोविड रूग्णालय यामध्ये पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित रूग्णालयाचा परवाना रद्द करून साथ रोग अधिनियम 1987, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियम 2011, महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा 2006, बॉम्बे नर्सिंग होम कायदा 2006, भारतीय दंड संहीता नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एस रामामर्तूी यांनी कळविले आहे.

असे आहेत दर

बुलडाणा जिल्हा कोविड दरांबाबत ‘क’ वर्गात येतो. त्यानुसार रूटीन वार्ड अधिक आयसोलेशनसाठी 2400 रूपये प्रति दिवस,  व्हेंटीलेटरशिवाय आयसीयु अधिक आयसोलेशन 4500 रूपये प्रति दिवस, व्हेंटीलेटरसह आयसीयु अधिक आयसोलेशन 5400 रूपये प्रति दिवस.  या दरांमध्ये रक्तातील सीबीसी तपासणी, युरीन तपासणी, एचआयव्ही स्पॉट अँटी एचसीव्ही, सेरम क्रीएटीनाईन, युएसजी, टु डी इको, एक्स रे, ईसीजी, ऑक्सिजन चार्जेस, बेड चार्जेस, नर्सिंग चार्जेस, जेवण आदींचा समावेश आहे.

 

Protected Content