जवानाच्या देशसेवेत कुटुंबियांचाही मोठा त्याग असतो : मंगेश चव्हाण

1f090d42 de0f 4270 8158 2b936e904f7d

चाळीसगाव (प्रतिनिधी) सीमेवर देशाची सेवा करण्यासाठी आपले कर्तव्य बजावत असताना जवान नेहमी आपले प्राण तळहातावर घेऊन अविरतपणे काम करत असतो. परंतु दुसरीकडे आपल्या कुटुंबापासून लांब राहून देशसेवा बजावत असताना. या जवानाच्या कुटुंबियांचाही यामध्ये मोठा त्याग असतो, असे मनोगत मंगेश दादा चव्हाण यांनी जामडी येथील सेवानिवृत्त जवान मनोज राजपूत यांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले.

 

चाळीसगाव तालुक्यातील जामडी येथील जवान मनोज अजबसिंग राजपूत हे दिनांक १ ऑगस्ट रोजी भारतीय सैन्य दलाची १७ वर्षे सेवा करून एसीपी नायक या पदावरून सेवानिवृत्त झाल्याने जामडी येथील दीपकसिंग राजपूत मित्र मंडळ व ग्रामस्थांनी त्यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करीत त्यांचे स्वागत केले.

 

यावेळी मंगेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करतांना पुढे म्हटले की, एक आई आपला मुलगा देशाला देते वडील भाऊ आपला सहकारी इतकी वर्ष आपल्यापासून लांब ठेवतो. आणि पत्नी प्रपंच सांभाळीत आपल्या पतीच्या चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करत असते. तेव्हा कुठे जवान भक्कमपणे देशसेवेत उभा राहू शकतो. यावेळी युवा नेते मंगेश चव्हाण यांनी मनोज राजपूत यांना सेवापूर्ती नंतरच्या पुढील आयुष्यात आरोग्यदायी व कुटुंबासाठी उत्तम राहो,अशा शुभेच्छा देऊन त्यांचा व त्यांच्या आई-वडिलांचा शाल श्रीफळ व शिवप्रतिमा देऊन सत्कार केला.

 

यावेळी चाळीसगाव नगरपालिकेचे नगरसेवक सोमसिंग राजपूत, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, नगरसेवक भास्कर पाटील, बाप्पू अहिरे, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप घोरपडे, रोहिणीचे सरपंच अनिल नागरे, जामडी येथील विजय हरी परदेशी, चेअरमन भामरे सोसायटी दीपकसिंग राजपूत, ग्रामपंचायत सदस्य भगवान महेर, तालुकाध्यक्ष राजपूत परदेशी, संतोष राजपूत, उद्योजक विजय हरी उघडे, विठ्ठल शंकर परदेशी, नगीन शेठ, सुकलाल परदेशी, उमराव परदेशी, शरीफ शेख, भिकन शेख, युसुफ पैलवान, अरुण जाधव, सचिन अहिरे, मोहिनुद्दीन टेलर, देवसिंग परदेशी, संजय पाटील, बाजीराव पाटील, संजय परदेशी, राजु परदेशी, श्याम सिंग परदेशी, विशाल परदेशी, प्रवीण परदेशी, विजय पूनावत, प्रताप परदेशी, कालू शेख लतीफ शेख, अन्वर पठाण, प्रदीप परदेशी, गोपाल परदेशी, रामदास जाधव, रणजीत चुंगडे, जीवन राजपूत तसेच दीपक राजपूत मित्र मंडळ व जय बजरंग भजनी मंडळ यांचे सदस्य उपस्थित होते.

Protected Content