हार्ट ऑफ गोल्ड : कोरोनाला हरवत पुन्हा कामावर रुजू होऊन कर्तव्य बजावणारा जांबाज हिरो…!

जळगाव । स्वत: कोरोनाने बाधीत झाल्यानंतर आपल्या वैद्यकसेवेच्या कामात पुन्हा रूजू होऊन जळगाव येथील डॉ. अमित भंगाळे यांनी समाजासमोर नवीन आदर्श घालून दिला आहे.

डॉ. अमित भंगाळे
सिव्हिल हॉस्पिटल
जळगाव

सलाम त्यांच्या चिकाटीला !

ड्युटी औषध विभागात त्यामुळे रात्री-बेरात्रीपर्यंत काम सुरूच. कितीही थकवा असेल तरीही लोकांची मदत करने नियमिय सुरूच.त्यामुळे स्वतः च्या तब्बेतीकडे दुर्लक्ष झाले. परंतु नंतर कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊन परिस्थिती हाताबाहेर, त्यामुळे पुण्यात उपचार. त्यातून बाहेर पडत पुन्हा ड्युटीवर रुजू होऊन रुग्णांची केली सेवा. ही कहाणी आहे डॉ. अमित भंगाळे यांची !

कोरोना काळात सिव्हिल हॉस्पिटलची परिस्थिती भयावह त्यातच ड्युटी होती औषध विभागात. न थकता, न थांबता रात्री उशिरापर्यंत डॉ. भंगाळे काम करीत होते. त्यात रात्री उशिरापर्यंत गोंधळ, धावपळ सुरूच होती. एके दिवशी तब्येत खराब झाली परंतु थकवा असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. माझे काम सर्वात आधी म्हणत त्यांनी आरामही नाकारला. परंतु नंतर पुन्हा त्रास जाणवला म्हणून स्वॅब रिपोर्ट काढले. दोन रिपोट निगेटिव्ह आले तरी त्रास सुरूच होता म्हणून सीटी स्कॅन केले व त्यात त्यांना निमोनियचे पॅचेस दिसू लागले. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर सिव्हिलला अ‍ॅडमिट न केल्याने शेवटी अंबुलन्सने पुणे गाठले.

पुण्याला अ‍ॅडमिट झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. त्यातच घरी चार वर्षांचा मुलगा त्याची काळजी होतीच. तरी सर्व संकटांना मात देत व दुसर्‍यांची मदत करायची आहे हा निश्‍चय मनात ठेवत त्यांनी कोरोनावर विजय मिळविला. त्यानंतर जळगावला परतून आराम करून पुन्हा रुग्णांच्या मदतीसाठी ड्युटीवर रुजू झालेत. रुग्णांच्या सेवेसाठी जेव्हा जेव्हा माझी गरज असेल तेव्हा तेव्हा परिणामांची पर्वा न करता मी हजर असेल असे त्यांचे बोल आहेत.

सलाम डॉ. अमित भंगाळे व त्यांच्यासारख्या सर्व जिगरबाजांना !

( अशाच प्रकारे कोरोनाच्या प्रतिकारासाठी झटणार्‍या कोरोना योध्द्यांना जळगावातील ख्यातनाम अशा रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे हार्ट ऑफ गोल्ड या मालिकेच्या माध्यमातून वंदन केले जात आहे. ही मालिका आपण लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरून देखील वाचू शकतात. )

अधिक माहितीसाठी

फेसबुक पेज : https://www.facebook.com/RCBafnaJewellers

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/rcb_jewellers

Protected Content