रजा कॉलनीतून मध्यरात्री घरातून मोबाईल लंपास

जळगाव प्रतिनिधी । रात्री उशीरा जेवण करून उशीला ठेवलेला मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार रजा कॉलनीत उघडकीस आला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नदीम खान युनूस खान (वय-२२, रा. रजा कॉलनी, संतोषी माता मंदिराजवळ जळगाव) हे मोटरसायकल मेकॅनिकचे काम करतात. नेहमीप्रमाणे २४ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास सर्व कुटुंबीय जेवण करून घराच्या कंपाउंडमध्ये उघड्या घराच्या पत्र्याच्या शेडमध्ये सर्वजण झोपलेले होते. नदीम यांनी त्यांचा विवो कंपनीचा मोबाईल झोपतांना उशीजवळ ठेवला होता. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने विवो कंपनीचा १३ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याचे प्रकार 25 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आला नदीम खान युनूस खान यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांनी विरोधात मोबाईल चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुद्दस्सर काजी करीत आहे.

Protected Content