जळगावात आ. भोळे यांच्या प्रचारासाठी खासदार पाटील टीमसह दाखल

c.r.patil

रावेर प्रतिनिधी । जळगाव विधानसभा मतदार संघातील भाजप उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचारासाठी सूरत (गुजरात) येथील खासदार सी.आर.पाटील, आमदार संगीता पाटील आपल्या टीम सह आज जळगाव शहरात दाखल झाले आहेत.

खासदार सी.आर पाटील यांच्या पत्नी गंगा पाटील, सूरत (लिंबायत) महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली पाटील, सूरत महापालिका बांधकाम सभापती सोमनाथ मराठे, आत्माराम पाटील, अमितसिंग राजपूत, नगर सेविका पोर्णिमा दाबले, माजी नगर सेवक ई.के पाटील, मुक्ताई नगर विधानसभा प्रमुख डॉ.नरेंद्र पाटील, अलकाबेन पाटील, देविदास पाटील, मुरलीधर पाटील, विठ्ठल पाटील, सुधाकर चौधरी, नाना पाटील, प्रदीप पाटील, नरसिंग चौधरी, आदी सूरत (गुजरात) भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील भाजपा उमेदवारांचा प्रचार करीत असून कॉनर मिटिंग घेऊन भाजपाला विजयी करण्याचे अवाहन करण्यात येत आहे.

Protected Content