Home राजकीय नवी मुंबईत शिक्षकाचा तरुणीवर अत्याचार

नवी मुंबईत शिक्षकाचा तरुणीवर अत्याचार


2rapecase 56
 

नवी मुंबई (वृत्तसंस्था) खारघरमधील खासगी शिकवणीतील एका शिक्षकाने तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे याच शिकवणीतील आणखी एका शिक्षकानेही तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.

 

खारघर सेक्टर 12 मधील महेश ट्युटोरिअल क्लासमध्ये तक्रारदार तरुणी पार्ट टाईम काम करत होती. मागील आठवड्यात सायंकाळी ती क्लासमधून निघाली. पण छत्री विसरल्यामुळे परत क्लासमध्ये आली. त्यावेळी शिक्षक दिनेश जैनने दरवाजा बंद करुन दमदाटी करत तिच्यावर अत्याचार केला. भीतीमुळे तरुणीने ही घटना कुटुंबीयांना लगेच सांगितली नाही. परंतु चार दिवसांनी दुसरे शिक्षक अनुप शुक्लानेही तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. अखेर तरुणीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला, त्यानंतर खारघर पोलिस ठाण्यात दोन्ही शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र दोन्ही आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरु आहे.


Protected Content

Play sound