खासदार निंबाळकरांवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीस अटक

Ajinkya Tekale Omraje Nimbalkar

उस्मानाबाद प्रतिनिधी । शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अजिंक्य टेकाळे असे आरोपीचे नाव आहे. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला करुन फरार झाला होता. उस्मानाबाद पोलिसांनी तपासाचे चक्र सुरु असतांना आरोपी अजिंक्य हा कळंब तालुक्यातील पाडोळी या गावातील एका शेतात लपून बसला होता. असे गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी त्याला मध्यरात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास शेतातून ताब्यात घेतले आहे.

ओमराजेंवर चाकूहल्ला
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूने खुनी हल्ला झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब इथं बुधवारी 16 ऑक्टोबरला ही धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात ओम राजे यांच्या हातावर वार झाल्याने ते जखमी झाले आहेत. चक्क खासदारावर हल्ला झाल्याने उस्मानाबादसह राज्यभरात एकच खळबळ उडाली.

खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. ओमराजे प्रचार सभास्थळी पोहोचून गाडीतून उतरले. तेव्हा त्यांच्याजवळ एक तरुण आला आणि त्याने निंबाळकरांच्या हातात हात दिला आणि दुसऱ्या हाताने त्याने चाकू काढत निंबाळकरांच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला.हल्लेखोराने पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र पवनराजेंनी हात अडवा धरल्यामुळे हातावर चाकूचा वार झाला.

Protected Content