जगदीश खट्टर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

jagdish khattar

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (सीबीआय) मारुती उद्योगाचे माजी व्यवस्थापकीय संचालक जगदीश खट्टर यांच्याविरूद्ध बँक कर्ज फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. खट्टर यांनी ११० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सीबीआयने लावला आहे.

अधिकारी यांनी मंगळवारी सांगितले की, खट्टर यांच्या नवीन कंपनीने बँक कर्जाची फसवणूक केली आहे. सीबीआयने अलीकडेच एफआयआर दाखल केला होता, ज्यात खट्टर आणि त्यांची कंपनी कार्नेशन ऑटो इंडिया लि. ११० कोटींचे नुकसान झाल्याबद्दल पंजाब नॅशनल बँकेवर (पीएनबी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारुती कंपनी सोडल्यानंतर खट्टर यांनी एक कारनेश ऑटो इंडिया कंपनीची स्थापन केली होती. या कंपनीने २००९ मध्ये पंजाब नॅशनल बँकेकडून १७० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०१५ मध्येच हे कर्ज एनपीए करण्यात आले. त्याच दरम्यान ११० कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याचे समोर आले आहे. जगदीश खट्टर यांच्यासह अन्य काहीजणांना याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. सीबीआयने फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे आदी कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Protected Content