

पुणे (वृत्तसंस्था) दिल्लीत‘आम आदमी पक्षा’ला मिळालेल्या यशात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे काहीही योगदान नाही. त्यामुळे त्यांनी शेखी मिरवू नये. तसेच पवार आणि शिवसेनेने भाजपला खिजवण्याचे काम करु नये, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्षपदी फेरनियुक्ती झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सुनावले आहे.

दिल्लीच्या निकालाचा टेंभा शिवसेनेनेही मिरवू नये. काँग्रेसने शरणागती पत्करली, त्यामुळे ‘आप’चा विजय झाला. ‘भाजप प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा माझी निवड झाली, याचा मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. नजीकच्या काळात घटनात्मक रचना पुन्हा नीट करण्याचे मोठे आव्हान आहे. अचानक गेलेल्या सरकारमुळे जी मरगळ आली, ती झटकून कार्यकर्ते पुन्हा एकदा कसे जोमाने कामाला लागतील, यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही चंद्रकांत पाटलांनी यांनी सांगितले.


