जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी अभिषेक पाटील यांची निवड करण्यात आली. या संदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नियुक्तीपत्र देवून निवड केली आहे.
दरमयान महानगर जिल्हाध्यक्षपदाची निवड कमरून माझ्यावर मोठी जबाबदारी पवारसाहेबांच्या आशिर्वादाने मिळालेली असून ज्या पद्धतीने युवक राष्ट्रवादीचा महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून मागील जबाबदारी पूर्ण केली अगदी त्याच निष्ठेने ही नवीन जबाबदारी पूर्ण करेल व या पदाचा उपयोग सर्वसामान्य जळगावकर जनतेच्या न्याय हक्कांसाठी व पक्षावाढीसाठी सदैव झटत राहील अशी प्रतिक्रीया नवनियुक्त महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केली. त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्यात.