म्हसावद येथे महिलेचा विनयभंग; चौघांवर गुन्हा

vinay bhang

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथे 58 वर्षीय महिला तिच्या घरात एकटी झोपलेली असताना चौघांनी प्रवेश करुन त्यापैकी एकाने तिचा विनयभंग करुन इतरांनी शिवीगाळ करुन धमकी दिल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हसावद येथील महिलेला एक मुलगा व एक मुलगी दोघेही विवाहित आहेत. मुलगा हा शहरातच पत्नी व मुलांसह वास्तव्यास आहेत. त्यामुळे महिला म्हसावद येथे घरी एकटीच राहते. 13 रोजी दुपारी 2 वाजेच्या महिला घराचा दरवाजा नुसता लोटून घरातील एका खोलीत झोपली होती. यावेळी अचानक महिलेच्या ओळखीचे ऋषी कपूर रा. अहमदनगर, संजय झंवर रा. म्हसावद व त्याच्यासोबत दोन व्यक्ती अशा चार जणांनी दरवाजा लोटून घरात प्रवेश केला. ऋषी कपूर याने महिलेची साडी ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तर त्याच्यासोत असलेल्या इतर तिघांनी शिवीगाळ तसेच धमकी दिली. यावेळी घराबाहेरुन जात असलेल्या व्यक्ती घरात आल्यानंतर चौघेही त्याठिकाणाहून पळ काढला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ऋषी कपूर, संजय झंवर यासह इतर दोघे अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content