एरंडोल जि.प. शाळेत ‘समता प्रबोधन मेळावा’ उत्साहात

J.P.shcool

कासोदा प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील भिल्ल वस्ती गाला पूरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज ‘समता प्रबोधन मेळावा’ संपन्न झाला आहे. बार्टी पुणेचे समता दूत अर्जुन गायकवाड यांनी जीवनात समतेला खूप महत्त्व असून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची समता विषयक मूल्य विद्यार्थ्यांना पटवून दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक तथा शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर होते. समता मेळाव्याच्या अध्यक्षीय समारोपात बोलताना म्हणाले की, भारतीय संविधानाने समतेला अनन्य साधारण असे महत्त्व दिलेले असून जीवनात सर्वत्र समता प्रस्थापित होण्यासाठी सर्वांनी मिळून पुढे येण्याची व कृतीयुक्त आचरणाची गरज आहे. त्यादृष्टीने केंद्र व राज्य शासन तसेच विविध सेवाभावी संस्था सातत्याने पुढाकार घेत आहेत. आपल्या भावी जीवनात विद्यार्थ्यांनी समतेची कास धरावी, असेही कुंझरकर म्हणाले.

शाळेची विद्यार्थिनी नंदिनी भील, आरती पवार, ओम पवार, योगेश सोनवणे, शिवनेर भिल, आनंदा भिल, रोहित भील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रेखा भील, कविता भील, सीमा सोनवणे, शबाना शेख, सुरेश भील, सखाराम भील, सुनील भील तसेच पालकांनी परिश्रम घेतले.

Protected Content