कढोली येथील विवाहात वर्‍हाडींना विषबाधा

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील कढोली येथील विवाहात भोजन केल्यानंतर सुमारे सव्वाशे स्त्री-पुरूषांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला असून यातील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

एरंडोल तालुक्यातील कढोली येथे बुधवारी भास्कर झावरु बडगुजर यांच्या मुलाचे लग्न होते. या लग्नासाठी आलेल्या मुलीकडील वर्‍हाडी व गावातील ग्रामस्थांनी जेवण केले. काही तासानंतर अनेकांना उलट्या होऊ लागल्या. तर काही जणांना जुलाब, डोकेदुखी, चक्कर येणे अशी लक्षणे जाणवू लागली.

यामुळे कढोली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्र रिंगणगाव व उपकेंद्र कढोली येथील वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली. जिल्हा परिषद सदस्य नाना भाऊ महाजन, कढोलीचे सरपंच किरण नन्नवरे यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख, डॉ. धीरजकुमार मराठे, डॉ. अमोल भंगाळे, डॉ मृदांक साळुंखे आदींनह तपासणीसाठी सहकार्य केले.

दरम्यान, तपासणीमध्ये चार जणांची प्रकृती जास्त खालावलेली असल्यामुळे त्यांना जळगावच्या रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Protected Content