Home Cities एरंडोल एरंडोल तालुक्यात सहा ग्रामपंचायतीत रंगणार निवडणूक !

एरंडोल तालुक्यात सहा ग्रामपंचायतीत रंगणार निवडणूक !

0
36

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा आखाडा रंगणार आहे.

तालुक्यातील रवंजे बु, रवंजे खुर्द,दापोरी,पिंपळकोठा प्र.चा,अंतुर्ली खुर्द या सहा गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमुळे थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण तापणार आहे. विशेष म्हणजे थेट जनतेतुन सरपंच पदाची निवड होणार आहे. यामुळे यंदाची निवडणूक तुफान गाजणार असल्याचे स्पष्ट आहे.
या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
१८ नोव्हेंबर निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे; २८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्रे सादर करणे; ०५ डिसेंबर रोजी नाम निर्देशन पत्राची छाननी; ०७ डिसेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ,०७ डिसेंबर निवडणूक चिन्ह वाटप व निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे ,१८ डिसेंबर आवश्यक असल्यास मतदान,२० डिसेंबर मतमोजणी व निकाल घोषित करणे याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे.


Protected Content

Play sound