‘भारत जोडो’ यात्रेच्या चित्ररथाचे उत्स्फुर्त स्वागत

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राहूल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनिमित्त आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या जनजागृती चित्ररथाचे ठिकठिकाणी अतिशय उत्साहात स्वागत करण्यात येत आहे.

तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज दि.११ शुक्रवार रोजी भारत जोडो पदयात्रा चित्ररथाचे युवकांनी ग्रामस्थांनी जोरदार स्वागत करण्यातआले. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सद्या देशभरात निघालेल्या यात्रेस देशातुन मोठा प्रतिसाद मिळत आहे. या भारत जोडो पदयात्रेचे टीव्ही स्क्रीनवर यात्रेचा हेतू व उद्देश्य याबाबत तसेच गांधी घराण्याचे भारत राजकारणा मधील योगदान व भूमिका या विषयी जमलेल्या नागरिकांना माहिती देण्यात आली.तसेच १८ नोव्हेंबर २२ रोजी भारत जोडो यात्रेनिमित्ताने यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी यावल पंचायत समिती माजी गट नेते शेखर सोपान पाटील, कॉंग्रेस कमेटी चे माजी जिल्हा अध्यक्ष संदिप भैय्या पाटील, कॉंग्रेस कमेटीचे राज्य कार्यकारणी सदस्य उमेश जावळे,पवन राणे, अमर कोळी डॉ,राजेंद्रकुमार झांबरे,भोजराज पाटील,लीलाधर जंगले, डोंगर कठोरा ग्रामपंचायत चे उपसरपंच धनराज पाटील, सामाजीक कार्य कर्ते डिगंबर खडसे,मयूर जंगले,चंद्रकांत भिरूड, राहुल आढाळे,भास्कर पाटील,किशोर कोल्हे,गबा पाटील यांच्यासह युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content

%d bloggers like this: