भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सम्राट कॉलनी लक्ष्मीनगरातील रहिवासी तरुण राष्ट्रीय महामार्गाने भुसावळ कडे जात असतांना भुसावळ रेाडवरील एचपी पेट्रोल पंपा समोर भरधाव कारने त्याच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला असून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील सम्राट कॉलनी येथील रहिवासी नरेश सत्यनारायण शर्मा (वय-३२) हा तरुण सोमवारी दुपारी दोन वाजता त्याच्या (एमएच.१९.डी.यु.७७१९) क्रमांकाच्या दुचाकीने जळगाव कडून भुसावळ कडे जात होता. खेडी जवळील एचपी पेट्रोल पंपा जवळ भरधाव वेगाने जाणार्‍या (एमएच.०६,३९६९) कारवरील चालकाने रस्त्याच्या परिस्थीती कडे दुर्लक्ष करुन दुचाकीला धडक दिल्याने नरेश शर्मा हा तरुण गंभीर जखमी झाला. अपघाता नंतर कार चालक न थांबता निघुन गेला असून जखमीच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक सुनील सेानार करत आहेत.

Protected Content