भरधाव डंपरची रस्त्याच्या कडेला उभ्या कंटेनरला धडक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून भरधाव वेगाने जाणार्‍या वाळूच्या डंपरने जोरदार धडक दिल्याची घटना नशिराबाद गावाजवळील महामार्गावरील हॉटेल जयभोले समोर घडली होती. याप्रकरणी डंपरचालकाविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंझोली तालुक्यातील जबलपुर गावात गुडालाल हजारीलाल चौधरी हे कंटेनरचालक आपल्या (एमपी १३ जीए ६६४१) ने २० मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास जळगाव भुसावळ महामार्गावरील नशिराबादगावाजवळील हॉटेल जयभोले समोर रस्त्याच्या कडेला त्यांनी कंटेनर उभा केला होता. याचवेळी मागून भरधाव वेगाने जाणार्‍या (एमएच १९ सीवाय ९९९२) क्रमांकाच्या वाळूच्या डंपरने कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातात कंटेनर रस्त्याच्या कडेला पलटी होवून नुकसान झाले. तसेच कंटरेनर चालक गुडालाल चौधरी यांच्या छातीला व पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच कंटेनरमध्ये असलेल्या पाईपांचे देखील नुकसान झाले आहे. याप्रकरणी सोमवारी १० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता कंटेनर चालकाच्या तक्रारीवरुन डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रविंद्र तायडे हे करीत आहे.

Protected Content