गर्दीत चालण्याची सवय नसल्याने राहूल गांधी पडले ! : दानवे

लातूर । काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांना गर्दीत चालण्याची सवय नसल्यामुळे ते हाथरस येथे जातांना पडले असल्याचे नमूद करत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांची खिल्ली उडविली आहे.

उत्तरप्रदेशातील हाथरस येथे जातांना राहूल गांधी यांना पोलीसांनी केलेल्या धक्काबुक्कीत ते पडल्याची घटना नुकतीच घडली असून यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तथापि, भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी या प्रकाराची खिल्ली उडविली आहे. गर्दीत जाण्याची सवय नसल्याकारणाने गर्दीत कसं चालावं हे त्यांना कळलं नाही. यामुळे राहुल गांधी पडले, असा खोचक टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. ते लातूर जिल्हा दौर्‍यावर असतांना बोलत होते.

याप्रसंगी रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर टीका केली. मागील सहा वर्षात काँग्रेसने फक्त भाजपच्या धोरणांना विरोध करण्याचे काम केलं आहे. मागील सहा वर्षांपासून देशात भाजपचे सरकार आहे. सरकारने वेळोवेळी घेतलेल्या सर्व निर्णयांना फक्त विरोध करणे एवढंच काँग्रेसचा अजेंडा आहे. जनमताअभावी काळ झालेलं तोंड विरोध करुन गोरं होतं का? हे पाहण्यासाठी काँग्रेस विरोध करतोय, असे टिकास्त्र रावसाहेब दानवे यांनी याप्रसंगी सोडले.

Protected Content