कोचुरच्या राणी परदेशीला पावरलिफ्टिंग राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रायपूर, छत्तीसगड येथे राष्ट्रीय वेस्ट झोन पावर लिफ्टिंग स्पर्धेत 44 किलो वजनी गटात राणी परदेशी हिने सुवर्णपदक पटकावले आहे. १४ जानेवारी रोजी ही स्पर्धा संपन्न झाली.

रायपूर, छत्तीसगड येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय वेस्ट झोन पावर लिफ्टिंग स्पर्धेत श्रीस्वामीनारायण स्पोर्टस क्लब सावदा रहिवासी खेळाडू राणी सुदाम परदेशी हिने 44 किलो वजनी गटात एकूण 147.5 किलो वजन उचलून सब ज्युनिअर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.

सदरील खेळाडू ही कोचूरची रहिवासी असून या खेळाडूचे तिच्या या यशाबद्दल सर्व गावकऱ्यांतर्फे तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. खेळाडूला श्रीस्वामीनारायण गुरुकुल सावदा येथील क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक पंकज महाजन सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content