Home आरोग्य रावेर तालुक्यात आरोग्य तपासणीसाठी पथकांची नियुक्ती

रावेर तालुक्यात आरोग्य तपासणीसाठी पथकांची नियुक्ती

0
46

 

रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी माझ कुटुंब माझी जबाबदारी या योजनेवर काम करण्यासाठी ९५ आरोग्य पथके आज गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी नियुक्त केले.

तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी आज पंचायत समितीने अंगणवाडी सेविका,आशावर्कर व शिक्षक अशी मिळुन तालुक्याच्या तपासणीसाठी ९५ पथके तयार केले आहे. यांच्यावर ग्राम सेवकांचे सुपरव्हीजन असणार आहे. यातील प्रत्येक पथक ग्रामीण भागातील नागरीकांच्या घरो-घरी जाऊन तपासणी करणार आहे.


Protected Content

Play sound