पाचोरा प्रतिनिधी । अमृत महोत्सव निमित्त “पॅन इंडिया अवेरनेस अँड आउटरिच” हा ४४ दिवसांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याच अनुषंगाने आज “बेटी बचाव बेटी पढाव” या उपक्रमाखाली तालुका विधी सेवा समिती पाचोरा व पाचोरा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा न्यायालयातुन रॅली व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांचे आदेशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त “पॅन इंडिया अवेरनेस अँड आउटरिच” हा ४४ दिवसांचा कार्यक्रमाचे दि. २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आज “बेटी बचाव बेटी पढाव” या उपक्रमाखाली तालुका विधी सेवा समिती पाचोरा व पाचोरा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा न्यायालयातुन रॅली काढण्यात आली. यावेळी रॅली न्यायालयातून निघाल्यानंतर गो. से. हायस्कूल – भुयारी मार्ग – पोलीस लाईन – साई मंदिर -मंगल प्रोव्हीजन – मुक्ता हॉस्पिटल – पुनगाव रोड मार्गाने पुन्हा पाचोरा न्यायालयात रॅलीचा समारोप झाला.
यावेळी ‘जहाँ बेटियां पढेगी, वहां विकास भी बढेगा’, “बेटी आज पढेगी, तो देश आगे बढेगा”, “आनंदी आनंद गडे, जेव्हा मुलगी अंगणात बागडे”, अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. यावेळी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एफ. के. सिद्दीकी, सहदिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे, तालुका विधी सेवा समितीचे सचिव तथा गटविकास अधिकारी अतुल पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी पी. एम. परदेशी, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष अॅड. अरुण भोई, विस्ताराधिकारी एस. बी. पाटील, अॅड. एस. बी. माहेश्वरी, अॅड. सुनील पाटील, अॅड. लक्ष्मीकांत परदेशी, अॅड. मानसिंग सिद्धू , अॅड. प्रशांत नागणे, अॅड. पी. डी. पाटील अॅड. वहाब देशमुख, अॅड. संदीप पाटील, अॅड. कविता म्हात्रे, अॅड. मीना सोनवणे, अॅड. भिकुबाई पाटील, अॅड.मनिषा पवार, तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ सहाय्यक अमित एस. दायमा, कनिष्ठ सहाय्यक दिपक के. तायडे, ईश्वर पाटील सचिन राजपूत, विधी शाखेचे विद्यार्थी मिस्लुरुब्बा शेख, सौरभ विसपुते, तुषार नैनाव, प्रवीण माळी, सागर सावळे, पाचोरा पोलीस स्टेशन कर्मचारी दिपक (आबा) पाटील, विकास सूर्यवंशी, गो. से. हायस्कूल येथील विद्यार्थी – विद्यार्थिनी, शिक्षक वृंद तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होते. रॅलीच्या समारोपाप्रसंगी एफ. के. सिद्दीकी, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, पाचोरा यांनी रॅलीस उपस्थिती दिल्याबद्दल आभार मानले. तसेच दुपार सत्रात गो. से. हायस्कुल पाचोरा येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ३० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेचा विषय “बेटी बचाओ बेटी पढाओ” असा ठेवण्यात आला होता. स्पर्धा यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, कला शिक्षक सुनिल भिवसने, सुबोध कांतायन, अजय अहिरे, राकेश सपकाळे, व इतर शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.