अमळनेरात महाविकास आघाडीकडून बंदचे आवाहन

अमळनेर प्रतिनिधी । उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी आंदोलनात नरसंहार करणाऱ्या योगी सरकारच्या निषेधार्थ शेतकऱ्‍यांचे मारेकरी भाजप व योगी सरकारच्या विरोधात अमळनेर मतदारसंघाच्या वतीने आज महाराष्ट्र बंद करण्यासंदर्भात आवाहन करून आरोपींना कठोर शासन व्हावे, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान अमळनेर शहरातुन महाविकास आघाडीने पुकारलेल्या या महाराष्ट्र बंदच्या हाकेला संपूर्ण तालुक्यातुन संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसून आला.अमळनेर शहराच्या मध्यातून सुरू झालेली बंदची हाक मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत-देत थेट तहसील कार्यालयात पोहचत निवेदन देण्यात आले.

 

 

 

 

 

 

 

Protected Content