आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी केंद्र शासनाच्या किमान आधारभुत किमत शासकीय भरड धान्य खरेदी योजने अंतर्गत धान्य खरेदीचे केंद्राचा शुभारंभ आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.

 

यावल येथील शासकीय धान्य गोदाम परिसरात आज रविवार दि. २ जानेवारी रोजी केंद्र शासनाच्या शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचा प्रारंभ आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते काटा पुजन करून करण्यात आला. याप्रसंगी शेतकरी बांधवांचे आमदार शिरीष चौधरी यांच्या ह्रस्ते सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून यावल पंचायत समितिच्या सभापती पल्लवी पुरूजीत चौधरी , जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे ,यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअररमन अमोल सुर्यकांत भिरूड, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक कृषी भुषण नारायण शशीकांत चौधरी, तहसीलदार महेश पवार , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पुंजो डीगंबर पाटील , अशोक चौधरी , काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, काँग्रेस कमेटीचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे यांच्यासह आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

Protected Content