महावितरणतर्फे बेरोजगार अभियंत्यांना कामाचे वाटप

अकोला – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अकोला जिल्ह्यातील विद्युत शाखेतील २६ बेरोजगार पदवी आणि पदविकाधारक अभियंत्यांना महावितरणकडून या आर्थिक वर्षात २ कोटी २४ लाख रुपयांची कामे लॉटरी पद्धतीने वितरित करण्यात आली.

सिव्हिल लाइन्स येथील मंडळ कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थित अभीयंत्यांना कामाचे वाटप करण्यात आले. नवीन वीज वाहिनी उभारणे, नवीन वीज खांब टाकणे, भूमिगत वीज वाहिनी टाकणे, वीज उपकेंद्राची दुरुस्ती आदी कामांचा यात समावेश आहे.

विदुयत शाखेतील पदविकाधारक आणि पदवीधारक तरुण/तरुणींना महावितरणकडून १० लाख रुपया पर्यंतची कामे विना निविदा देण्याची तरतूद केली आहे. ही  कामे एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास लॉटरी पद्धतीने वाटल्या जातात. जिल्हा नियोजन समिती आणि पध्दती सुधारणा योजना, अंतर्गत मिळालेल्या निधीतून या कामाचे वाटप करण्यात आले, अशी माहिती महावितरणकडून उपस्थितांना देण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, कार्यकारी अभियंता ज्ञानेश पानपाटील, उपकार्यकारी अभीयंता बेलूरकर उपस्थित होते.

Protected Content