राहूल नार्वेकर यांची केंद्रीय पक्षांतर बंदी समितीचे अध्यक्ष म्हणून निवड

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी रविवारी पक्षांतर बदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी दिली असल्याचं बोललं जात आहे.

बिर्ला ८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलनाला उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, संसद सदस्यांची कार्यकुशलता वाढवण्यासाठी नियमितपणे राजकीय पक्षांची चर्चा आवश्यक असते. त्यांचे संरक्षक म्हणून पीठासीन अधिकाऱ्यांच्या काही जबाबदारी असतात. निर्णय असा घेतला जावा की पुढील पीढीला प्रेरणा मिळत राहील.

 

Protected Content