रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये हार घालून आपतर्फे महापालिकेचा निषेध आंदोलन (व्हिडीओ )

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील पांडे चौक ते बेंडाळे चौकापर्यंतच्या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर खड्डे पडले आहे. महापालिकेचे या रस्त्याकडे साफ दुर्लक्ष झाल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने गुरूवार ११ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता खड्ड्यात हार घालून महापालिका प्रशासनाचा निषेध आंदोलन करण्यात आले.

 

गेल्या अनेक महिन्यांपासून जळगाव शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. महापालिका प्रशासनाला आतापर्यंत रस्ता दुरूस्तीबाबत अनेक तक्रारी व निवेदने देण्यात आली. परंतू याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाचे साफ दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे जात असल्याने रस्त्यावरून वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच हा रस्ता अद्यात दुरूस्ती देखील न केल्यामुळे रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याने रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या रूग्णांचे जाण्या येण्यासाठी मोठे हाल होत आहे. तसेच पायी चालणे अवघड झाले आहे. रस्ता दुरूस्ती व्हावा यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. हा रस्ता राम भरोसे आहे. असे म्हणून महापालिकेच्या वतीने आम आदमी पार्टीच्या वतीने नाकर्तेपणाचा निषेध नोंदवून येत्या १५ दिवसात हा रस्ता दुरूस्ती न झाल्यास याच रस्त्यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे.

याप्रसंगी महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर, जळगाव शहर अल्पसंख्याक अध्यक्ष रफिक कुरेशी, मिडिया प्रवक्ता योगेश भोई, जळगाव शहर संघटक प्रमुख रत्नाकर सरोदे, दुर्गेश निंबाळकर, पवन खंबायत, बंटी खरात, शकील शेख, माधवराव जाधव यांच्यासह आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content