Home राजकीय पुढील १५ वर्षे शिंदे-फडणवीस सरकार राहणार : शहाजीबापू पाटील

पुढील १५ वर्षे शिंदे-फडणवीस सरकार राहणार : शहाजीबापू पाटील

0
48

सांगोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टिकास्त्र सोडतांना सरकारची जोरदार पाठराखण केली आहे.

आगामी दसरा मेळाव्याच्या पार्श्‍वभूमिवर आयोजीत कार्यक्रमात आमदार शहाजीबापू पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, दसरा मेळाव्याला पवारांचे गोडवे गाणार्‍यांनी शिवतीर्थावर जावं तर बाळासाहेबांचा कडवा विचार ऐकणार्‍यांनी बीकेसी मैदानावर यावे. शिंदे गटाचा दसरा मेळावा हा जोरदार होणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

तर, यावेळी शहाजी पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली. अजित पवार यांना आता भाषणे ऐकण्याशिवाय काही काम राहिलं नसल्याचे शहाजी पाटील म्हणाले. अजितदादांनी आता फक्त शिंदे, ठाकरे, इंदोरीकर महाराजांची भाषणे ऐकावीत असा टोला देखील त्यांनी मारला.

दरम्यान, पवार यांनी कितीही राज्याचे दौरे केले तरी पुढचे १५ वर्षे शिंदे-फडणवीस यांचेच सरकार राहणार असल्याचे शहाजीबापू पाटील म्हणाले. यामुळे विरोधकांच्या टिकेला काहीही मूल्य नसल्याचा पलटवार त्यांनी केला.


Protected Content

Play sound