अंधश्रद्धेतून भाऊ व पुतण्यांनी मिळून केला महिलेचा घात….

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चांडोळ येथील शेतातील विहिरीत एका ६० वर्षीय महिलेचे प्रेत आढळून आले. अंधश्रद्धेतून या महिलेचा भाऊ व पुतण्या यांनी तिचा घातपात केल्याची चर्चा रंगत असून धाड पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

धनाबाई सुभाष गोमलाडू यांना त्यांच्या शेतात मारून राऊत यांच्या शेतातील विहिरीत टाकण्यात आल्याची खळबळ जनक घटना चांडोळ शिवारात घडली. मृतक महिलेच्या कपाळावर एकाबाजूला जखम सुद्धा दिसून आली. तसेच अंगावरची साडी सुद्धा गायब होती. त्यामुळे सदरील घटनेत घातपात झाल्याच्या शंकेला उधाण आले आहे.   धाड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथील रहिवाशी धनाबाई सुभाष गोमलाडू वय ६० वर्ष या महिलेचे पासोडी – चांडोळ रस्त्यावर मराठवाडा सिमेवर शेत आहे. धनाबाई गोमलाडू  ह्या २८ सप्टेंबर रोजी शेतामध्ये गेल्या होत्या, परंतु त्या सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने त्यांचा मुलगा व नातेवाईकांनी गावात तसेच आजु-बाजुच्या परिसरात शोध घेतला. तेव्हा शामराव राऊत यांच्या शेतातील विहिरीत त्या महिलेचे प्रेत पाण्यावर तरंगताना निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अनिल पाटील हे पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी महिलेचे प्रेत विहिरीच्यावर काढल्यावर पंचनामा केला.  त्यावेळी धनाबाई गोमलाडू यांचे कपाळ चपलेले तसेच अंगावरची साडी सुद्धा गायब होती.

घटनेची फिर्याद गेंदुसिंग भाउलाल पाकळ यांनी धाड पोलिसांत दिली. त्यावरून धाड पोलिसांनी आरोपी मृतकाचा भाऊ हिरालाल रतनसिंग बलावणे, गोपीबाई हिरालाल बलावणे, संजय हिरालाल बलावणे व रंजीत हिरालाल बलावणे या चारही आरोपी विरुद्ध भादवी कलम 302/34 अन्वे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास डीवायएसपी सचिन कदम आणि  ठाणेदार अनिल पाटील, पो.उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपो.सचिन पाटील करीत आहे.

भानामतीच्या संशयावरून महिलेचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तशी फिर्याद् पोलिसात प्राप्त झाल्याने त्या दिशेने पोलीस तपास करित आहे.

मृतक महिलेने आमच्या तरुण मुलास  भानामती करून मारल्याचा आरोप मारेकरी करीत आहे. मुलाचा बदला काढण्यासाठी चक्क भावनेचं बहिणीचा खून केल्याने समाजमन सुन्न झाले आहे.

 

घटनास्थळी डीवायएसपी यांची भेट…

चांडोळ शिवारात वृध्द महिलेस मारून ज्या विहिरीत फेकण्यात आले.  त्या घटनास्थळी बुलढाणा डीवायएसपी सचिन कदम यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच तेथे डॉग स्कॉट पाचारण केले.

 

डॉग स्कॉटने लावला तपास…

घटनास्थळी ज्युली नावाच्या डॉग स्कॉटने झाडावरील पडलेल्या खुनाच्या डागावरून मृतक महिलेची मारेकऱ्यांनी लपवलेली साडी शोधून काढली. त्यावरून घटनेच्या तपासास गती मिळाली.

 

Protected Content