जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेतात अत्याचार करणाऱ्या नराधमाला जिल्हा न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २ जुलै २०१६ रोजी मुलगी ही शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेली होती. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बकऱ्या चारून येत असतांना दिलीप दौलत वाघ (वय-४५) याने मुलीला कुऱ्हाडीचा धाक दाखवत शेतात घेवून गेला. त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. या संदर्भात पिडीत मुलीने जामनेर पोलीस ठाण्यात दिलीप वाघ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
हा खटला जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमुर्ती आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. सहाय्यक सरकारी वकील पंढरीनाथ चौधरी यांनी या खटल्यात १२ साक्षीदार तपासण्यात आले. यात पिडीत मुलगी, तिची आई, वैद्यकीय अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक आणि तपासी अमलदार यांची साक्ष महत्वपुर्ण ठरल्या. सरकारपक्षातर्फे केलेल्या प्रभावी युक्तीवाद करण्यात आल्याने आरोपी दिलीप दौलत वाघ याला दोषी ठरविण्यात आले. लैगिंक अत्याचार आणी पोक्सो कायद्यांर्गत १ हजार रूपयाचा दंड आणि तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पैरवी अधिकारी म्हणून प्रमोद कुळकर्णी यांनी सहकार्य केले.