बोगस पावत्यांच्या आधारावर ५२० कोटी इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले

 

मुंबई : वृत्तसंस्था । साखर स्रमाट रत्नाकर गुट्टे यांचा मुलगा सुनील गुट्टेला अटक करण्यात आली आहे. जीएसटी गुप्तचर महासंचलनालयाने ही कारवाई केली आहे. वस्तू आणि सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बोगस पावत्यांच्या आधारावर ५२० कोटी रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवल्याचा आरोप सुनील गुट्टेवर आहे.

सुनील गुट्टेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.रत्नाकर गुट्टेंचा मुलगा सुनील गुट्टे हे हायटेक इंजिनिअरींग लिमिटेडचे संचालक आहेत. कागदपत्रांची अफरातफर करुन बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच आयटीसी मिळवल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली.

सुनील हायटेक इंजिनीअर्स लिमिटेडने अंदाजे तीन हजार कोटींच्या बनावट पावत्या दिल्या आणि घेतल्या. यात ५२० कोटींचा आयटीसी समाविष्ट आहे. या बोगस बिलांचं जाळं नवी दिल्ली, हैदराबाद, लुधियाना, गुरुग्राम, मेरठ, अहमदाबाद आणि कोलकातापर्यंत पसरलं आहे. देशभरात बनावट पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतल्या प्रकरणी सुनील हायटेक इंजिनीअर्स लिमिटेडची मुख्य भूमिका आहे.

Protected Content