दोन लाखांची मागणी करत विवाहितेला मारहाण

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील भोरस गावातील माहेर असलेल्या विवाहितेला सुरत येथील सासरी दोन लाखांची मागणी करत शिवीगाळ व मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी ९ मे रोजी दुपारी ३ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील भोरस येथील माहेर असलेल्या पुजा जयेंद्र खरताडे वय २६ यांचा विवाह सुरत येथील जयेंद्र गणपत खरताडे यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नानंतर काही महिने चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला दुकान घेण्यासाठी माहेराहून २ लाख रूपये आणावे अशी मागणी करत तिला मारहाण व छळ केली. त्यानंतर तिचे सासू, जेठ, जेठाणी यांनी देखील शारिरीक व मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी भोरस येथे निघून आल्या. त्यानंतर त्यांनी गुरूवारी ९ मे रोजी दुपारी ३ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.त्यानुसार पती जयेंद्र गणपत खरताडे, सासू सखूबाई गणपत खरताडे, जेठ दिपक गणपत खरताडे आणि जेठाणी पुनम दिपक खरताडे सर्व रा. सुरत गुजरात यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण सपकाळे हे करीत आहे.

Protected Content