तहसील कार्यालयातील ईव्हीएम ठेवलेल्या गोदामच्या छताला आग; जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तहसील कार्यालयातील निवडणुकीसाठीचे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाच्या छतावर फटाक्यांचे रॉकेट पडल्यामुळे गोदामावरील टाकलेला प्लास्टिकचा कागद पेटल्याचा प्रकार रविवारी १२ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता घडला होता. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर तातडीने आग विझवण्यात आली. दुसर्‍या दिवशी सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी भेट देत पाहणी केली.

भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये असलेल्या गोदामात निवडणुकीसाठी लागणारे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहे. पाऊस गोदामात पडू नये म्हणून गोदामाच्या छतावर पत्रांवर प्लास्टिकचा कागद टाकण्यात आला आहे. रविवारी १२ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दिवाळी सणात कुणीतरी रॉकेट उडवल्यानंतर त्याची ठिणगी गोदामाच्या छतावर पडली व त्यामुळे आग लागली. भुसावळ पालिकेच्या अग्निशमन दलाला कळवताच काही वेळात बंबाने ही आग विझविण्यात आले आहे.

सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

Protected Content