चितोडा ग्रामपंचायतीचा मनरेगा कामात घोटाळा ; बीडीओवर कारवाईची मागणी

 

 यावल  :  प्रतिनिधी  ।  चितोडा ग्रामपंचायतीने  मनरेगा कामात घोटाळा केला असून दोषी लाभार्थ्यांना मदत करणाऱ्या बीडीओवर कारवाई करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते निवृत्ती  धांडे  यांनी केली आहे

 

तालुक्यातील चितोडा गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत वैयक्तीक लाभ मिळवुन घेण्यासाठी प्रशासनाची दिशाभुल करणारे लाभार्थी व त्यांना अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष व माहीती अधिकार कार्यकर्ते निवृत्ती धांडे यांनी जि प मुख्य कार्यकारी अधिकारी  यांच्याकडे केली आहे .

 

निवृत्ती धांडे यांनी   म्हटले आहे की , यावल तालुक्यातील चितोडा येथे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राहणाऱ्या लतीका   जंगले यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतुन वैयक्तीक लाभ म्हणुन गोठा शेड बांधकामासाठी शासनाकडुन ८१ हजार रुपयांच्या निधीचा लाभ घेतला  लतिका जंगले यांच्या नांवाने चितोडा  येथील सरपंच आणी ग्रामसेवक यांनी  बांधकाम पुर्ण झाल्याचा दाखला दिला आहे . मात्र   दर्शविलेल्या मालमत्तेच्या जागेवर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे गोठा बांधकाम झाल्याचे दिसुन येत नाही किंवा कोणतेही शेड अथवा गोठा त्या ठिकाणी नाही . संबधीत लाभार्थी यांनी शासनाची दिशाभुल करून योजनेचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले आहे .

 

गोठा लाभार्थी लतिका जंगले यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे . शासनाच्या नियमानुसार गोठा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याकडे  गाय , म्हैस किंवा शेळ्या असणे बंधनकारक आहे या लाभार्थ्याकडे कुठलेही गुरे नाहीत  नियमाप्रमाणे योजने मध्ये ग्रामपंचायत अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामांवर नियंत्रण अधिकारी म्हणुन विस्तार अधिकारी ( पंचायत समिती ) यांच्याकडे  जबाबदारी आहे

 

ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरकारभारास सरपंच , उपसरपंच , किंवा ग्रामपंचायत सदस्य किंवा कर्मचारी जबाबदार असल्यास अनुसरायची कार्यपद्धती  आहे . या नियमानुसार यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी दाखल केलेल्या आहेत  गटविकास अधिकारी यांनी एक महीन्याच्या आत चौकशी पुर्ण केली नाही टाळाटाळ केली  त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी  धांडे  यांची मागणी आहे .

Protected Content