Home Cities अमळनेर दुदैवी घटना : शौचालयाच्या टाकीत पडल्याने चिमुकल्याचा बुडून मृत्यू

दुदैवी घटना : शौचालयाच्या टाकीत पडल्याने चिमुकल्याचा बुडून मृत्यू

0
83


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शौचालयाच्या टाकीत दोन वर्षाचा चिमुकला पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कावपिंप्री येथे सोमवारी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास समोर आले आहे.  भूषण दिलीप सोनवणे (वय-२) रा. कावपिंप्री ता. अमळनेर असे मयत चिमुकल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथील अशोक सोनवणे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने त्याठिकाणी शौचालयासाठी लागणारी टाकीचे बांधकाम करण्यात आले असून ही टाकी पुर्णपणे पाण्याने भरलेले होते. दरम्यान भूषण सोनवणे याचा शौचालयाच्या टाकीत पडून बुडून मृत्यू झाला होता. हा बाब त्याचे आजोबा लिलाधर गोविंदा सोनवणे यांना शौचालयाच्या टाकीत चिमुकला भूषण हा टाकीत मयतावस्थेत तरंगतांना दिसून आला. त्याला बाहेर काढून तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत अमळनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील करीत आहे.

महिन्याभरापुर्वीच वडीलांचे निधन

मयत मुलगा भूषण याचे वडील दिलीप लीलाधर सोनवणे यांचे १७ ऑक्टोबर रोजी दुर्धर आजाराने निधन झाले होते. त्यातच आता दिपावलीच्या दिवशी चिमुकलाचा दुदैवी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली असून सोनवणे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


Protected Content

Play sound