धरणगाव (प्रतिनिधी) काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाई आघाडीच्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार पुष्पाताई ज्ञानेश्वर महाजन यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सायंकाळी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली.
शहरातील मोठा माळी वाडा, रामलीला चौक, सत्यनारायण चौक, खत्री गल्ली, गबानंदा चौक, संजय नगर, गौतम नगर, नवेगाव, लहान माळी वाडा , कोट बाजार या परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली. प्रचार रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँगेसचे उपजिल्हाध्यक्ष व धरणगाव न.पा चे माजी उपनगराध्यक्ष दिपकभाऊ वाघमारे, कृउबा माजी सभापती पुनीलाल महाजन , युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे , ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब देवरे, सिताराम मराठे, जयेश महाजन, सागर वाजपाई, राहुल पाटील, अजय महाजन, अमोल सोनार, मोहनिस चंदेल, प्रवीण जोगी, बुऱ्हाण शेख, हर्षल पाटील, गौरव भागवत तसेच आघाडीचे सर्व कार्यकर्ते व महिलांनी यांनी शहरातून जोरदार प्रचार केला.